Share

CM Mamata Meets PM Modi : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्याच्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) च्या थकबाकीसह विविध मुद्द्यांवर चर्चा केली. ममता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेऊ शकतात.

यापूर्वी, ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत पक्षाच्या खासदारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संसदेचे चालू अधिवेशन आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार बॅनर्जी यांचे पुतणे आणि पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी या बैठकीत जोरदार बोलले आणि त्यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसांमध्ये खासदारांनी कोणते मुद्दे उपस्थित करावेत हे सुचवले. दोघांनीही भाजपला घाबरू नका, असे स्पष्टपणे पक्षाच्या खासदारांना सांगितले.

नीती आयोगाची बैठक

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी ७ ऑगस्ट रोजी नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीचे अध्यक्षस्थानी असतील. ज्यामध्ये कृषी, आरोग्य आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.

ममता बॅनर्जी सोनिया गांधी यांचीही भेट घेऊ शकतात-

शनिवारी टीएमसी, टीआरएस आणि आप सारख्या बिगर-काँग्रेस विरोधी नेत्यांसोबत बैठक होणार आहे. ममता बॅनर्जी दिल्लीत सोनिया गांधी यांचीही भेट घेऊ शकतात, अशी चर्चा होत आहे.

 
महत्वाच्या बातम्या :
 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!