🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजविरुध्द सुरू असलेल्या टी-२० मालिकेनंतर झिम्बाब्वेशी भिडणार आहे. हा दौरा याच महिन्यात आयोजित करण्यात आलेला आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात ३ सामान्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. त्यापूर्वी झिम्बाब्वे क्रिकेट संघाने आपली चांगलीच ताकद दाखवली आहे. त्यांनी बांगलादेशला ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ अशी धूळ चारली आहे. क्रेग एर्विनच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वे संघाने बांगलादेशविरुद्धची पहिली टी-२० मालिका जिंकली आहे. या मालिकेतील शेवटच्या निर्णायक सामन्यात झिम्बाब्वेने बांगलादेशवर १० धावांनी विजय मिळवला.
झिम्बाब्वेने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात बांगलादेशचा १० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वे संघाने ८ बाद १५६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात खेळताना बांगलादेशचा संघ ८ गडी गमावून १४६ धावाच करू शकला. या विजयासह झिम्बाब्वेने मालिकाही २-१ ने जिंकली. झिम्बाब्वेसाठी हा ऐतिहासिक विजय असून बांगलादेशला अशा पराभवाला सामोरे जावे लागेल याची कल्पनाही त्यांनी केली नसेल.
भारताचा हा गेल्या ६ वर्षातील पहिलाच झिम्बाब्वे दौरा आहे. याआधी टीम इंडियाने २०१६ साली धोनीच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे दौरा केला होता. तेव्हा प्रत्येकी ३ सामन्यांची वनडे आणि टी-२० मालिका झाली होती. यावेळी टी-२० सामने होणार नाहीत, कारण २७ ऑगस्टपासून यूएई येथे आशिया कप होणार आहे. त्यामुळे भारताचे दोन संघ मैदानावर उतरवले जाण्याची शक्यता आहे.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे, वनडे मालिका
पहिली वनडे- १८ ऑगस्ट
दुसरी वनडे- २० ऑगस्ट
तिसरी वनडे- २२ ऑगस्ट
महत्वाच्या बातम्या :
- T20 World Cup : भारतीय क्रिकेट संघाच्या ‘या’ माजी कर्णधाराने घातले थेट निवडकर्त्यांनाच साकडे, म्हणाला…!
- Maharashtra Cabinet Expansion : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या?, सविस्तर वाचा…
- CWG 2022 : भारतीय महिला क्रिकेट संघाची जबरदस्त कामगिरी, केला सेमीफायनलमध्ये प्रवेश!
- Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | शिवसेना कुणाची? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज ‘सर्वोच्च’ सुनावणी!
- IND vs SA : भारतीय संघ पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेशी भिडणार, ‘असे’ आहे सामन्यांचे वेळापत्रक!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
