Share

Sushma Andhare | “मुख्यमंत्र्यांचा निष्ठावंत होण्यासाठी शिंदे गटात रस्सीखेच”; सुषमा अंधारे यांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पुण्यातील कात्रज परिसरात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून केल्याचं म्हटलं जात आहे. कारण याच परिसरात काल शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची सभा देखील होती. त्याचवेळी त्या भागातून जाणाऱ्या उदय सामंत यांच्या गाडीच्या ताफ्यावर उपस्थितांनी हल्ला केला. त्यामुळे हल्ला करणारे हे शिवसैनिकच होते, असं शिंदे गटाचं म्हणणं आहे. या हल्ल्याचा शिंदे समर्थकांनी निषेध केला आहे. यावरच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत शिंदे गटाला निवडणूकीला सामोरं जाण्याचं आव्हान केलं आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “अब्दुल सत्तार असतील किंवा उदय सामंत असतील, ही सगळीच नेते मंडळी मंत्रिमंडळाचा विस्तार राहिल्यामुळे असे वागत आहेत. मीच एकनाथ शिंदेंचा निष्ठावंत आहे, मीच कसा जास्त प्रामाणिक आहे, हे त्यांना दाखवायचे आहे. त्यामुळेच मलाच शिवसेनेने डोळ्यावर धरलं आहे, हे दाखवण्यासाठी ते हे सगळं करत आहेत. मी फक्त शिंदेंच्या जवळचा आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यापासून लांब गेलो आहे, हे सिद्ध करण्यासाठी या लोकांची आपापसात रस्सीखेच सुरु आणि ती अत्यंत किळसवाणी आहे.”, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.

“शिंदे गटातील जे असं म्हणताहेत कि आम्ही हल्ल्याला हल्ल्यानेच उत्तर देऊ त्यांना एवढच सांगायचं आहे कि, तुम्ही ज्या शाळेत शिकला आहात, त्या शाळेचे संस्थापक सदस्य इथलेच होते.”, असा इशाराही सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाला दिला आहे. तसेच पुढे बोलताना त्या असेही म्हणाल्या कि, “जास्त उडया मारू नका. जर हल्लेच करायचे असतील तर लोकशाहीच्या मार्गाने करा. शिंदे गटाच्या आमदारांनी राजीनामे द्या, मग बघा लोक कसे मतपेटीतून हल्ले करतात. आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत, त्यामुळे खरंच तुम्ही एकदा राजीनामे द्याच.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!