🕒 1 min read
Eknath Shinde । मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. रात्री 12 वाजता ईडीने ही कारवाई झाली. यावेळी राऊतांच्या घरी ईडीला मोठी रक्कम सापडली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. याबाबत सुनिल राऊत यांनी खुलासा केला आहे. संजय राऊतच्या अटकेची माहिती भाऊ सुनील राऊत यांनी दिली. यावेळी ते म्हणाले कि, जी काही रक्कम (10 लाख) मिळाली, ती शिवसैनिकांच्या अयोध्या भेटीसाठी होती. त्या पैशावर एकनाथ शिंदे अयोध्या यात्रा असेही लिहिले आहे.
यावरून मोठा गदारोळ उडाला होता. यावर स्वतः एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात मुख्यमंत्र्यांनी आज पाच जिल्ह्यांतील पूरस्थितीची आढावा बैठक घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय राऊत यांच्या घरात पैसे सापडले आहेत, त्यामुळं याबाबत तुम्ही त्यांनाच विचारायला हवं. त्यांच्या घरात सापडलेल्या पैशांवर माझं नाव कसं आलं हे मला माहिती नाही. त्यांच्या घरातील पैशांवर मी माझं नाव लिहू शकतो का? असा सवाल करता त्या पैशांबाबत तुम्हाला संजय राऊतच सांगू शकतील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सध्या संजय राऊत यांना सोमवारी दुपारी पीएमएलए कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने संजय राऊत यांच्या घरातून 11.50 लाख रुपये जप्त केले आहेत. तसेच ईडीचे वरिष्ठ अधिकारीही रात्री उशिरा दिल्लीहून मुंबईत पोहोचले आहेत. संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | सत्कार स्विकारण्यारपेक्षा शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा – अजित पवार
- Shahajibapu patil | “२२ वर्ष ते काम करतायेत अन् आमचं बघा…”; शहाजीबापूंचा ठाकरेंना टोला अन् पवारांचे कौतुक
- Shahjibapu Patil । अजित दादा माणूस खूप चांगला, पण देवाने त्यांना नरडं लय करंड दिलंय; शहाजीबापूंचा टोला
- Praniti Shinde | त्यांचे जरी ओके असलं तरी महाराष्ट्रातील जनतेच नॉट ओके – प्रणिती शिंदे
- Shahajibapu Patil | आम्ही एकनाथ शिंदेंना घेऊन गेलो, ते आम्हाला नाही – शहाजीबापू पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
