Share

Bhagat Singh Koshyari । मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा हेतू नव्हता; वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपालांचे स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

Bhagat Singh Koshyari | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलेलं आहे. गेले अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यात आता आणखीन वाढ झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मुंबई आणि महाराष्ट्र संदर्भात वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. कोश्यारी यांनी अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात बोलत असताना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले होत.

यावेळी कोश्यारी म्हणाले कि, महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, अस वादग्रसत्त वक्तव्य त्यांनी केले होत. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे.

राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर आज दिवसभर राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी राज्यलांच्या वक्तव्याचा निषेद केला तसेच मोठ्या प्रमाणावर टीका देखील केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर थेट पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यपालांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली. यानंतर या घडामोडींवर आता स्वतः कोश्यारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी ते म्हणाले कि, मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला आहे. तसेच मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता.

केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!