🕒 1 min read
दिल्ली : आज शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग प्रदर्शित झाला. ही मुलाखत राज्यासह संपूर्ण देशभरात गाजत आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप, एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर चौफेर टीका केली. यानंतर आता राजकीय वर्तुळातून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तरं देण्यात येत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“उद्धव ठाकरे म्हणतात कि, माझे वडील माझा वारसा आहेत. त्यांना एकच विचारायचं आहे वारसा फक्त रक्तानेच येतो का? वारसा विचाराने नसतो? बाळासाहेबांचे किती विचार आत्मसात केले आणि किती आमलात आणले हे उद्धव ठाकरेंनी सगळ्यांना सांगावं. बाळासाहेबांनी जेवढ प्रेम दिलं, सहवास दिला, त्याच्या कितीतरी पटीने जास्त दु:ख त्यांनी बाळासाहेबांना दिलं. ताप अन् संताप दिला. अक्षरश: छळ केला”, असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
तसेच पुढे बोलताना त्यांनी एक आश्चर्य चकित करणारी गोष्ट सांगितली. राणे म्हणाले कि, “बाळासाहेबांचं स्वास्थ्य बिघडण्यामागचं कारण हे उद्धव ठाकरे होते. त्यातच उद्धव ठाकरे हे दोन वेळा घरातून पळून देखील गेले होते. त्यांना जर हे आठवत असेल तर त्यांना विचारा कि त्यांना दोन्ही वेळेस परत कुणी आणलं? अहो, या नारायण राणेनी परत आणलं. त्यांच्या अंगात खोटारडेपणा, कपटीपणा आहे. असा व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवून अडीज वर्षात ना जनतेचे ना शिवसैनिकांचे ना हिंदुत्वाचे भले झाले, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.
महत्वाच्या बातम्या:
- Jayant Patil | “…म्हणून उद्धव ठाकरे त्यांचे अचानक नावडते झाले”; जयंत पाटलांची बंडखोरांवर टीका
- Narayan Rane : “आदित्य ठाकरेंना शेंबूड पुसता येतो का?, कुणाला काहीही गद्दार म्हणता”; नारायण राणेंची सडकून टीका
- Ashish Shelar | उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच – आशिष शेलार
- Shahjibapu Patil : उद्धव ठाकरे आजारी होते तर एकनाथ शिंदेंना चार्ज द्यायचा होता – शहाजीबापू पाटील
- Virat Kohli : विराट कोहलीकडे अजूनही ३० ते ३५ शतकं ठोकण्याची क्षमता – रॉबिन उथप्पा


