Share

Uddhav Thackeray : आम्हाला पुरावे द्यायची गरज नाही, शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray । मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला धक्का दिल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. शिवसेनेतील अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंना समर्थन दिल आहे. मात्र या सर्व घडामोडी घडत असताना शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना मोठ्या प्रमाणात टार्गेट केलं आहे. तसेच आमच्याकडे आमदार आणि खासदारांची संख्या जास्त असल्याने शिवसेना पक्षचिन्ह आम्हालाच मिळणार, असा प्रबळ दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. यावर आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले कि, शिवसेना आणि धनुष्यबाण हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे याबाबत निर्णय आता निवडणूक आयोग घेणार आहे. पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, आपला कायद्यावर विश्वास आहे. सत्याचा विजय होईल. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये दिलेल्या मुलाखतीत याबाबत सविस्तर भाष्य केलं आहे. जे काही सुरु आहे ते दुर्दैवी आहे. माझा अजूनही देशाच्या घटनेवर भरवसा आहे, कायद्यावर भरवसा आहे. आम्हाला पुरावे द्यायची गरज नाही. लोक म्हणतात निवडणुक येऊ द्या. यांनाच पुरून टाकतो. जनताच यांना राजकारणातून पुरून टाकेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

दरम्यान, शिवसेनेतून एकनाथ शिंदे हे बंड करून बाहेर पडले. यानंतर आता शिंदे आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. आपल्याकडे 50 आमदार आणि 12 खासदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहुमत सिद्ध करण्याचे लेखी पुरावे मागितले आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!