Share

OBC Reservation : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात भुजबळ, मुंडे आणि वडेट्टीवारांनी ओबीसी आरक्षणाची लढाई यशस्वी करुन दाखवली – अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज महाविकास आघाडी सरकारनं नेमलेल्या बांठिया आयोगाचा अहवाल राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सादर केला. हा अहवाल सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारला आहे. यानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने आज बांठिया आयोगाचा अहवाल मान्य केला असून या अहवालानुसार निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. यानंतर यावरून राजकीय वर्तुळात आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी दिलेला मानवतेचा, सामाजिक न्यायाचा विचार महाराष्ट्रात सदैव जिवंत राहील, हा विश्वास सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयातून पुन्हा एकदा दृढ झाला आहे. महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या कल्याणासाठी घेतेलेले निर्णय व सुरु केलेल्या योजना यापुढेही सुरु राहतील, याची काळजी विरोधी पक्ष म्हणून आम्ही निश्चित घेऊ, राज्यातील ओबीसी बांधवांच्या एकजुटीतून तसंच संपूर्ण महाराष्ट्रानं ओबीसी आरक्षणाला दिलेल्या एकमुखी पाठिंब्याच्या बळावर हे यश मिळालं आहे. महाराष्ट्राची ही एकजूट यापुढेही कायम ठेवूया अशा शब्दात अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

आदरणीय शरद पवार साहेबांनी त्या काळात राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या बाजूनं ठाम भूमिका घेतली व राज्यात ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाला. ते आरक्षण अबाधित राहिलं, याचा आनंद आहे.ओबीसी आरक्षणासाठी ठाम भूमिका घेण्याचं काम आधीपासून आम्ही केलं. हीच भूमिका यापुढेही कायम राहील, असंही अजित पवार म्हणाले. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार तसंच अन्य नेत्यांनी ओबीसी आरक्षणासाठीची लढाई आज यशस्वी करुन दाखवली असल्याचे मत देखील अजित पवार यांनी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!