Share

Congress : “मोदींना टेलिप्रॉम्प्टर लागतो आणि शिंदेंना फडणवीस”, कॉंग्रेसचा टोला

Published On: 

🕒 1 min read

 मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या सहकार्याने राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नवीन सत्ता असल्याने शिंदे-फडणवीस सावलीसारखे एकमेकांसोबत असल्याचे दिसून येते. मात्र आतापर्यंतच्या अनेक पत्रकार परिषदेत शिंदेंअगोदर फडणवीसच अनेक प्रश्नांची उत्तरे देताना दिसून आले. यावरूनच काँग्रेसने (Congress) एक व्हिडिओ पोस्ट करत शिंदे-फडणवीस यांना टोला लगावला आहे.

“कधीपर्यंत चालणार हा कठपुतळीचा खेळ मुख्यमंत्र्यांना स्वतः बोलण्यासाठी फडणवीस मिळू देतील का वेळ?”, असे कॅप्शन देत कॉंग्रेसच्या अधिकृत ट्वीटरवर एक व्हिडिओही पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात फडणवीसच सर्व प्रश्नाची उत्तरे देताना दिसून येतात. यामध्ये मोदींना टेलिप्रॉम्प्टर लागतो आणि शिंदेंना फडणवीस असे म्हणत कॉंग्रेसने चांगलेच डिवचले आहे.

उद्या पॅन्ट ओढून नागडं…

दरम्यान मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद चालू असताना पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला, त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला सुरू केलं तेवढ्यात फडणवीसांनी थेट त्यांच्या समोरचा माईकच काढून घेतला आणि त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर दिले. यावरून आता विरोधक सडकून टीका करत आहेत. यावरच शिवसेना नेते विनायक राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

विनायक राऊत यांनी कोल्हापुरात म्हटले कि, “यांचं राज्य सहा महिने टिकलं तर नशीब. आज माइक ओढत आहेत, उद्या पॅन्ट ओढून नागडं करतील यांना. हे आज बंडखोर आहेत यांना यापुढे राजकीय आयुष्य नाही.”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!