🕒 1 min read
मुंबई : ठाकरे सरकारने औरंगाबाद शहराला ‘संभाजीनगर’ असे नाव देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. त्याचबरोबर उस्मानाबाद शहराचे नाव बदलून ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला होता. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दिवंगत दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आले होते. मात्र आता या नामांतराच्या निर्णायाला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. मात्र या निर्णयाला स्थगिती का दिली याबाबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिल आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले कि, आम्ही जेव्हा हिंदुत्वाची भूमिका घेतली तेव्हा शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. शेवटची कॅबिनेट बेकायदेशीर आहे. जेव्हा सरकार अल्पमतात असतं. आम्ही राज्यपालांना पत्र दिलं होतं की सरकार अल्पमतात आहे. आम्ही कोर्टातही भूमिका मांडली होती. त्यामुळे ही कॅबिनेटच बेकायदेशीर होती. त्यामुळे उद्या सकाळी आम्ही अधिकृत कॅबिनेट घेऊन या निर्णयावर शिक्कामोर्तब करणार आहोत. असा दावा त्यांनी केलाय.
दरम्यान, शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं म्हणणाऱ्यांनी आता औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर का थांबवलं? औरंगजेब हा सरकारचा नातेवाईक कधीपासून झाला? मुळात असा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे. सुप्रीम कोर्टाची टांगती तलवार सरकारवर आहे. त्यामुळे काही काम नसल्याामुळे हे सरकार निर्णयांना स्थगिती देत सुटले आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shahaji Bapu Patil | पुन्हा घुमणार “काय झाडी, काय डोंगार…” चा आवाज; शाहाजी बापू पाटील येणार ‘थुकरटवाडीत’
- IND vs ENG : लॉर्ड्सवर टीम इंडिया अडचणीत असताना चाहत्यांना आली धोनीची आठवण; पाहा VIDEO!
- Devendra Fadnavis’ Aukshana : राज ठाकरेंच्या पत्नींने केले देवेंद्र फडणवीस यांचे औक्षण
- Delhi : दिल्ली पुन्हा हादरली! धावत्या कारमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; घटनेचा बनवला VIDEO
- Sanjay Raut : “चिठ्या देतात, माईक खेचतात…” ; संजय राऊतांची शिंदे सरकार टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
