Share

Virat kohli : “विराटला बळीचा बकरा…” ; पाकिस्तानच्या ‘या’ माजी खेळाडूचं कोहलीबाबत मोठं वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विराट कोहली त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. सध्या त्याच्या खराब फॉर्मची क्रिकेट जगतात सर्वाधिक चर्चा होत आहे. कोणी त्याला क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा सल्ला देत आहे, तर कोणी त्याला संघातूनच वगळण्याबाबत बोलत आहे. या सगळ्या दरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफनेही कोहलीबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. कोहलीचा अलीकडच्या काळातील फॉर्म पाहता एका चांगल्या प्रशिक्षकाचे मार्गदर्शन घेण्याचा सल्ला लतीफने त्याला दिला आहे.

रशीद लतीफ त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, “आधुनिक क्रिकेट वेगळे आहे. बाबर आझम, मोहम्मद रिझवान, विराट कोहली, रोहित शर्मा.. प्रत्येकाच्या खेळात काही ना काही कमकुवतपणा आहे. आजच्या जमान्यात तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, त्यामुळे फलंदाजांची कमजोरी पटकन समोर येते. मात्र, असे असूनही खेळाडूंनी आपला खेळ बदललेला नाही. केन विल्यमसन देखील कोहलीसारख्याच वाईट टप्प्यातून जात आहे. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू खेळणे त्याच्यासाठी एक समस्या ठरत आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंनी त्यांच्या वाईट टप्प्यातून जात असताना मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्याचबरोबर सर्वोत्तम प्रशिक्षकाशी बोलून आपली कमजोरी दूर करण्यासाठी काम केले पाहिजे.”

गांगुलींच्या विधानाशी लतीफ असहमत

पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज लतीफने कोहली बाबत वक्तव्य केले आहे. त्याने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींच्या अलीकडील कोहलीच्या खराब फॉर्मबद्दलच्या विधानावरही नाराजी व्यक्त केली. गांगुली यांनी विराटच्या खराब फॉर्म बाबत विधान केले होते की, त्याला स्वतःलाच यातून मार्ग काढावा लागेल. लतीफला गांगुलीचे हे विधान आवडलेले नाही. त्याने गांगुलींवर निशाणा साधत कोहलीला बळीचा बकरा बनवले जात असल्याचे म्हटले आहे.

जर कोहली धावा काढत नसेल तर संघातील बाकी खेळाडू काय करताय?

या मुद्द्यावर बोलताना लतीफ म्हणाला की, ‘तुम्ही संघातील एका खेळाडूबद्दल बोलत आहात. पण संपूर्ण भारतीय संघ सातत्याने सामने जिंकत नाही. तुम्ही विराटच्या खांद्यावर बंदूक ठेवून बाकीच्या खेळाडूंना सुरक्षित ठेवत आहात. तुम्ही २०१९ चा विश्वचषक आणि २०२१ चा टी-२० विश्वचषक बघा. जर विराटने कामगिरी केली नाही तर बाकीचे खेळाडू काय करत होते? गेल्या टी-२० विश्वचषकात भारताची कामगिरी अत्यंत खराब होती. मागील टी-२० विश्वचषकात पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताला ग्रुप स्टेजमधून बाहेर पडावे लागले होत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!