Share

Sanjay Shirsat : “शिवसेनेचा उमेदवार हरला तर बाळसाहेब एक ग्लास….”, संजय शिरसाट यांचे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत राज्यात भाजपच्या सहकार्याने शिंदे -फडणवीस सरकार स्थापन केले आहे. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. शिंदे यांच्या गटातील आमदार आपल्या कार्यकर्त्यांना शिंदे गटात शामिल करून घेत आहेत. दरम्यान काल रात्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या नेतृत्त्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.  यावेळी शिरसाट यांनी मोठे वक्तव्य करत खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

“बाळासाहेब असताना शिवसेनेचा उमेदवार हरला तर ते फक्त एक ग्लास दूध प्यायचे. पण आज काही लोक रोज सकाळी उठून शरद पवारांकडे जातात.”, असा टोला संजय शिरसाठ यांनी राऊतांना लगावला. यावेळी शिरसाट यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक करत म्हटले कि, रात्री सभा घेण्याची ताकद फक्त एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. मी रिक्षाचालक आमचे मुख्यमंत्रीही रिक्षाचालक, तुमच्याकडे इनकमिंग आहे. शिंदे साहब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.

तसेच मतदारांनी आपल्याला खऱ्या अर्थांने प्रेम दिले. त्यामुळे मतदारांनी शिवसेना मोठी केली आहे. काही लोक रोज टिव्हीवर बोलतात त्यांना काय बोलाव हेच कळत नाही. एक जन तर रोज शरद पवार यांचे गुण गाण गात सुटले आहे. असा टोलाही शिरसाट यांनी राऊतांना लगावला.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!