🕒 1 min read
मुंबई: राज्यात पावसाचा जोर खूपच वाढला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. गटारे आणि नदी, नाल्यांमधून पाणी ओसंडून वाहत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क येथील रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाच्या कामातील उणिवा दाखवत संबंधित अधिकाऱ्यांवर आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
देशपांडे म्हणाले की, ४ कोटी रुपये खर्च करून सुद्धा या प्रकल्पाचे काम नीट पूर्ण झालेले नाही. पावसाच्या पाण्यामुळे छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर चिखल झाला आहे. पावसाचे पाणी बोरवेलमध्ये जाणे अपेक्षित होते मात्र चिखल झाल्यामुळे ते पाणी बोरवेलमध्ये जात नसून मैदानावरच साचून राहत आहे. तसेच आसपासचे कॅनॉल देखील चॉक अप झाले आहेत. ज्यामुळे या मैदानाची पूर्णपणे वाट लागली आहे आणि याला केवळ आदित्य ठाकरे आणि तेव्हाचे वॉर्ड ऑफिसर किरण दिगावकर हे जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी यावेळ केला. तसेच आदित्य ठाकरे आणि किरण दिगावकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Nilesh Rane :”दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा…”, ‘त्या’ वक्तव्यानंतर निलेश राणेंचा इशारा
- IND vs ENG : भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये मोहम्मद शमीच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद; पाहा VIDEO!
- Amol Mitkari : “उगाच आम्हाला तोंड उघडायला लाऊ नका, हवेतून खाली या”; अमोल मिटकरींनी केसरकरांना सुनावलं!
- Eknath Shinde । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आनंद दिघे यांच्या स्मृतींना अभिवादन
- Jitendra Awhad : “जिथे आहात तिथे सुखी राहा, खाजवून खरूज…”; जितेंद्र आव्हाडांचा केसरकरांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
