Share

KL Rahul । लवकरच होणार केएल राहुल आणि अथिया शेट्‌टीचे ‘शुभमंगल’; लग्नाची तयारी सुरु

Published On: 

🕒 1 min read

KL Rahul । महाराष्ट्र देशा डेस्क:  भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांचं नातं त्यांनी कधीही जगापासून लपवलेलं नाही. हे दोघे लग्नबंधनात कधी अडकणार याची त्यांचे चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. यातच आता खबर येत आहे की राहुल आणि अथिया हे येत्या तीन महिन्यांनंतर लग्न करणार आहेत. दोघांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.

अथिया आणि राहुल हे जवळपास तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ते दोघे येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये लग्न करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलचे आई-वडील नुकतेच अथियाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मुंबईत आले होते. त्यानंतर राहुल आणि अथिया दोघेही कुटुंबासोबत नवीन घर पाहायला गेले होते. यातच आता आथियाने स्वतःची तयारी देखील सुरु केली आहे. अभिनेता सुनील शेट्टीचे कुटुंब अथियाच्या लग्नासाठी खूपच उत्सुक आहे. हा लग्नसोहळा अतिशय दिमाखात पार पडणार आहे. मात्र अजूनही लग्नाची तारीख आणि स्थळ स्पष्ट झालेले नाही.

काही दिवसांपूर्वी राहुलच्या पाठीला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे राहुल भारताच्या इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला होता. त्यांनतर तो उपचारासाठी जर्मनीला गेला. त्यावेळी अथिया शेट्टीही त्याच्यासोबत उपस्थित होती. अथिया नेहमीच केएल राहुलसोबत त्याच्या क्रिकेट सामन्यांसाठी जात असते. त्याचबरोबर सुनील शेट्टी देखील अनेक वेळा राहुलला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असतो.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!