Share

IND vs ENG : भारताचा कर्णधार रोहित शर्मानं जिंकला टॉस; पहिल्या वनडे सामन्यासाठी ‘असे’ आहेत दोन्ही संघ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध टी-२० मालिकेत २-१ ने बाजी मारल्यानंतर आता एकदिवसीय मालिका खेळणार आहे. आज या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. सामन्याच्या सुरुवातीला भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टी-२० मालिकेत भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली होती. त्याचप्रमाणे एकदिवशीय मालिकेतही भारतीय संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

भारतीय संघात अनेक वरिष्ठ खेळाडूंचे आगमनही झाले आहे. सलामीचा डावखुरा फलंदाज शिखर धवन चे बऱ्याच काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले आहे. तो आज कर्णधार रोहित सोबत सलामीला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. तर दुसरीकडे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीही आज सामन्यात खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर इंग्लंडच्या संघातही अनेक खेळाडूंचे आगमन झाले आहे. इंग्लंडचा कसोटी संघ सध्या चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे त्यांच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याचेही एकदिवसीय सामन्यात पुनराभवान झालेले आहे. टी-२० मालिकेतील भारतासाठी उत्तम कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादव ही आजचे सामन्यात खेळताना दिसणार आहे.

असे आहेत दोन्ही संघ
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा.

इंग्लंड – जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, क्रेग ओव्हरटन, रीसे टॉपली, डेविड व्हिली, ब्रायडन कार्स.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!