🕒 1 min read
मुंबई: दहिसर येथे निष्ठा यात्रादरम्यान शिवसैनिकांशी संवाद साधताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोरी करत शिवसेनेमधून बाहेर पडलेल्या आमदारांवर निशाणा साधला होता. थोडी जरी लाज, हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन दाखवा, असे आव्हान त्यांनी शिंदे गटाला दिले होते. यावरच शिंदे गटातील भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“सेना-भाजपाने पुन्हा युती करून सत्ता स्थापन करावी अशीच लोकांची भावना होती. मात्र आपण असंगाशी संग करत काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केली. लोकभावनेला पायदळी तुडवत असताना तेव्हा आपल्याला लाज वाटली नव्हती का?”, असा खोचक सवाल भरत गोगावले यांनी विचारला आहे.
तसेच आम्ही बाळासाहेबांचा हिंदूत्ववादी विचार लोकभावनेचा आदर करत सेना भाजपा युतीचे सरकार स्थापन केले असून आम्हाला लाज बाळगण्याची आणि राजीनामा देण्याची गरज नाही. पूर्वी झालेल्या चूका टाळून आता तरी असंगाशी संग सोडा, असेही भरत गोगावले यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Shalini Thackeray : “अगोदर डुक्कर, गद्दार विशेषणे लावायची मग…”, शालिनी ठाकरेंचा ‘शिवसेने’वर निशाणा
- Shinde VS Thackeray : आजची सुनावणी लांबणीवर?; शिंदे-ठाकरे सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन निर्णयाकडे लक्ष
- IND vs ENG : सूर्याची तुफानी शतकी खेळी व्यर्थ, इंग्लंडचा १७ धावांनी विजय
- Salary Management- पगार महिन्याच्या अगोदरच संपतोय? मग हे नक्की वाचा
- Sharad Pawar : औरंगाबादच्या नामांतराबाबत शरद पवारांनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
