🕒 1 min read
मुंबई: शिवसेनेशी बंड करत सत्तास्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे गटावर शिवसेनेने अपात्रतेची कारवाई केली होती, याला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेतेपदी नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिका शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केल्या असून यावरच आज ११ जुलै रोजी सुनावणी निश्चित केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयातील सोमवारच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश नसल्याने ही सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे सह १६ आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बजावलेल्या नोटिशींविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च याचिका दाखल केली आहे. २७ जूनला झालेल्या सुनावणीत ११ जुलै ही पुढील सुनावणीची तारीख ठरवण्यात आली होती. यानंतर शिवसेना आणि शिंदे गटाने वेगवेगळय़ा याचिका दाखल केल्या आहे.
दरम्यान या सर्व याचिकांवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने ११ जुलै रोजी सुनावणी ठरवली होती. सदरील त्रिसदस्यीय पीठाची कार्यसूची रविवारी जाहीर करण्यात आली. त्यात या याचिकांचा सुनावणीसाठी समावेश नाही. त्यामुळे सदरील सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
शिवसेना आणि शिंदे गटाच्या आमदारांना नोटीसा-
विधान सभेत बहुमत चाचणीच्या दरम्यान शिवसेना आणि शिंदे गटाकडूनही व्हीप जारी करण्यात आला होता. या माध्यमातून आपलाच पक्ष खरा असे सांगण्याचा प्रयत्न शिवसेना आणि शिंदे गटाकडून करण्यात आला होता. त्यामुळे या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आतापर्यंत पक्षावर दावा करण्याच्या हेतून शिंदे गटाकडून शिवसेना आमदारांना आणि शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. यानंतर विधीमंडळ सचिवांनी शिवसेना आणि शिंदे गटातील आमदारांना नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे या आमदारांना 17 जुलैपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IND vs ENG : सूर्याची तुफानी शतकी खेळी व्यर्थ, इंग्लंडचा १७ धावांनी विजय
- Salary Management- पगार महिन्याच्या अगोदरच संपतोय? मग हे नक्की वाचा
- Sharad Pawar : औरंगाबादच्या नामांतराबाबत शरद पवारांनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…
- Ajit Pawar : अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका; म्हणाले,’मी पण कामं करतो पण कधी कॅमेरा…’
- CM Eknath Shinde : आपल्याच माणासांनी आमच्यावर अनेक वार केले, आणि ते आम्ही झेलले – एकनाथ शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
