मुंबई : अमानाथमधील पवित्र गुहा परिसरात ढगफुटी झाल्याची घटना शुक्रवारी (८जुलै) घडली. या घटनेमध्ये लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी दुःख देखील व्यक्त केले. यामध्ये रवीना टंडन ने देखील दुःख व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे.
रवीना टंडनने देखील या घटनेबाबत ट्विट केलं आहे. रवीनाने या घटनेचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “प्रार्थना”. अमरनाथ येथे झालेल्या ढगफुटीनंतर सोशल मीडियाद्वारे अनेक जण व्यक्त होताना दिसत आहेत.
Prayers ???????? https://t.co/vOUi9NDI37
— Raveena Tandon (@TandonRaveena) July 8, 2022
दरम्यान अमरनाथ गुहेच्या परिसरात शुक्रवारी संध्याकाळी ५.३० वाजता ढगफुटी झाली. माहितीनुसार पर्वतांमधून जोरदार हवा तसेच पावसामुळे भाविकांचे २५ टेंट वाहून गेले होते. तर पावसामुळे येथील परिसरात खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या घटनेमध्ये मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे.
महत्वाच्या बातम्या :


