🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध शनिवारी ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना खेळणार आहे. पहिला सामना ५० धावांनी जिंकून भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. यानंतरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. दुसऱ्या सामन्यात संघात बदल करण्यात आला असून विराट कोहली प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करणार की नाही हा प्रश्न आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने विराट कोहलीच्या संघात खेळण्याबाबत मत व्यक्त केले आहे.
वरीष्ठ खेळाडू दुसऱ्या टी-२० मधून संघात पुनरागमन करणार आहेत. इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळणाऱ्या संघाचा भाग असल्याने खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, रवींद्र
जडेजा आणि ऋषभ पंत यांचे संघात पुनरागमन झाले आहे. या वरीष्ठ खेळाडूंच्या दुसऱ्या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे. पहिला सामना जिंकणाऱ्या संघाला हार न मानण्याचा सल्लाही भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने दिला आहे.
झहीर म्हणाला, “दुसऱ्या सामन्यासाठी संघ निवडी बाबत कोणते निर्णय घेतले जातील हे इथे बसून विचार करणं खूप कठीण आहे. तुम्ही पाहिलं आहे की, भारतीय संघाने मालिकेतील पहिला टी-२० सामना जिंकला आणि आता उर्वरित मालिका बाकी आहे. राहिलेल्या सामन्यांसाठी संघात कोणताही बदल करणार नाहीत, संघात काही बदल करणार आहे असे मला वाटत नाही. जर काय करायचे असेल तर मला फक्त एकच बदल दिसत आहे. त्यासाठी ही आपल्याला वाट पाहावी लागणार आहे.
पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी करणारा युवा गोलंदाज अर्शदीप सिंग दुसऱ्या सामन्यासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्याच्या जागी भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात पुनरागमन करेल हे नक्की आहे. याव्यतिरिक्त संघात इतर कोणतेही बदल व्हावेत असे मला वैयक्तिकरित्या तरी वाटत नाही, असे मत जाहीर खानने व्यक्त केले.
दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-२० साठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, इशान किशन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवन कुमार, अवनीश खान. हर्षल पटेल, उमरान मलिक
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
