🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेने सर्वसामान्यांना संधी देऊन नेतृत्व उभा केले त्याचाच विसर जर यांना पडला असेल तर बाळासाहेब ठाकरे देखील यांना माफ करणार नाही असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. ते नाशिक येथे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावरही निशाणा साधत टोला लगावला आहे.
मतदार संघात निधीचा तुटवडा ही कारणे सांगण्यासाठी असली तरी त्यांचे दुखणे वेगळेच आहेत. गुलाबराव पाटलांचा (Gulabrao Patil) तर जुलाबराव असे म्हणत त्यांना मिळालेले ५० खोके कधीच पचणार नसल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. तसेच हे सर्व पेशासाठी केल्याचा आरोपही त्यांनी आमदारांवर केला आहे.
दरम्यान बंडखोर आमदारांनी केलेला तो उठाव नसून गद्दारी आहे. सर्वसामान्य जनता आजही पक्षाच्या पाठीशी आहे. त्यामुळे काही आमदारांनी पक्ष सोडला म्हणजे त्याचा पक्षावर काही परिणाम होणार नाही. असे संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Deepali Syyed | “शिंदे गटातील प्रवक्ते व आमदारांची उद्धव साहेबांशी चर्चा करण्याची विनंती” ; दिपाली सय्यद यांचे ट्विट
- Sanjay Raut | “आपले अस्तित्व वाचवण्यासाठी शिंदे गटाचे आमदार…” ; संजय राऊतांचा हल्लाबोल
- Shahaji Bapu : “काय झाडी, काय हाटील..”, फेम शहाजी बापू यांचा कार्यकर्त्याने घेतला थेट ‘मुका’; PHOTO व्हायरल
- Alia Bhatt : नीतू कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त सून आलियाने दिली ‘ही’ खास भेटवस्तू
- Swapnil Joshi : “विठ्ठल विठ्ठल…जय हरी विठ्ठल…” म्हणत आषाढी वारीमध्ये स्वप्नील जोशी मग्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
