🕒 1 min read
मुंबई : राज्यात सध्या एकनाथ शिंदे व भाजप यांचे सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आहे. मात्र या सरकारच्या मंत्रिमंडळाचा अजून कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांनीही मंत्रिमंडळाबाबत लवकरच निर्णय केला जाईल अशी माहिती दिली आहे. त्यामुळे आता कोणत्या नेत्याला किती आणि कोणते मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांनी देखील मंत्रीमंडळात स्थान मिळावे अशी फडणवीसांकडे मागणी केली आहे.
रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी आरपीआयला मंत्रिमंडळात वाटा हवा. महामंडळातही आरपीआयला स्थान मिळावे, अशी आठवलेंची इच्छा आहे. सत्तेमध्ये आरपीआयला ही वाटा द्यावा, अशी मागणी यावेळी त्यांनी फडणवीसांकडे केली. सत्तेमध्ये आम्हाला वाटा मिळावा, ही आमची इच्छा आहे. तशी मागणी आम्ही आज देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केली आहे.
दरम्यान, ११ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतर केव्हाही निकाल लागण्याची शक्यता आहे. ११ जुलै रोजी सर्व याचिकांवर सुनावणी केल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित याचिकेवर १६ जुलैला सुनावणी होणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टातील या याचिकांवर एकदा सुनामी झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले होत.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
