Share

Sanjay Gaikwad : “उद्धव साहेबांबद्दल काहीही बोलू नका, अन्यथा…”; शिंदे गटातील संजय गायकवाडांचा सोमय्यांना इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील मोठ्या सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या पोहोचले. त्यानंतर त्यांनी ट्वीट करून या भेटीचा फोटो शेअर केला. किरीट सोमय्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, मंत्रालयात आज रिक्षावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्र्यांना हटवल्याबद्दल अभिनंदन केलं. मात्र सोमय्यांच्या याच वक्तव्याचा समाचार बुलडाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी घेतला आहे.

आता शिवसेना संपली असं किरीट सोमय्यांनी समजू नये. ही तीच शिवसेना आहे व आम्ही सत्तेत भाजपा-शिवसेना युती म्हणून काम करतोय. आम्ही बाहेर पडलो याचा अर्थ बाळासाहेब, उद्धव साहेबांबद्दल आमची श्रद्धा नाही, असा समज किरीट सोमय्यांनी करून घेऊ नये. तसेच यापुढे त्यांनी अशी वक्तव्ये करू नये, अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही, असा इशाराच आ.संजय गायकवाड यांनी दिला आहे. यामुळे आता भाजपा व शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर येत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, याआधी शिंदे गटाची माध्यमांमधून बाजू मांडणारे आमदार दीपक केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असा शब्द वापरणे आम्हाला मान्य नाही. अशा शब्दांचा वापर केला जाऊ नये, असा इशारा दिला आहे. यानंतर शिंदे आणि भाजप गटात वादाची पहिली ठिणगी पडल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!