Share

Eknath Shinde : देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – एकनाथ शिंदे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोड्या वेळापूर्वी लाईव्ह येत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केलं आहे. एकनाथ शिंदे यांचा गट आमच्या सोबत आला आहे. अजूनही अपक्ष आमच्यासोबत आले आहेत. याबाबतचं पत्र आम्ही राज्यपालांना देणार असल्याचं देखील ते म्हणाले आहेत. यानंतर एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलतांना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना म्हणाले कि, एक मजबूत सरकार महाराष्ट्रात येईल. मोदी, शहा आणि नड्डाजींचं पाठबळ मिळेल. ज्या राज्याबरोबर केंद्राची ताकद उभी राहते तिथे विकासात कोणताही अडथळा येणार नाही. हे सरकार विकासासाठी कटिबद्ध आहे. लोकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्यात कटिबद्ध आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासला तडा जाऊ देणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, भाजपसोबत आमची नैसर्गिक युती असून आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप आभार. आम्ही राज्याच्या विकासासाठी काम करणार आहोत. फडणवीस सरकारमध्ये नसले तरी ते सरकारच्या पाठीशी आहेत. तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. तसेच या सरकारचे केंद्राशीही चांगले संबंध असतील आणि आम्ही राज्यासाठी केंद्रासोबत काम करू, असे सांगितले. केंद्रात भाजपचे सरकार असल्याने आम्हाला अधिक बळ मिळेल, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!