🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय उलथापालथ होत असताना आता नवीन सरकार स्थापनेची कसरत जोरात सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने काल बहुमत चाचणी संदर्भात दिलेल्या आदेशानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने एकनाथ शिंदे आणि भाजपने राज्यात नवीन सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. संध्याकाळी सात वाजता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत.
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत भाजपचे देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. त्याचवेळी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. राजभवन येथे अतिशय छोटेखानी पद्धतीन होणार शपथविधी सोहळा होणार आहे.
बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे भाजप नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पोहोचले आहेत. बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच मुंबईत पोहोचले आहेत. थोड्याच वेळात ते राज्यपालांचीही भेट घेणार आहेत. एकनाथ शिंदे आज गोव्याहून मुंबईत पोहोचले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
