Share

Ram Satpute : “मनोरुग्ण संजय राऊतांच्या मार्गदर्शनात असणारं सरकार गेलं”, ‘भाजप’चा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडाने आज राज्यातील ठाकरे सरकार कोसळले. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेची आज ही अवस्था झाल्याचे भाजपकडून सतत म्हटले जात आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काल (२९ जून) रात्री ९ वाजता फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत आपले मुख्यमंत्री पद सोडले. अनेक राजकीय घडामोडीनंतर अखेर महाराष्ट्रातील राजकारणावर पडदा पडला.  यानंतर भाजप नेते राम सातपुते (Ram Satpute) यांनी थेट संजय राऊतांवर (Sanjay Raut) निशाणा साधला.

मनोरुग्ण संजय राऊतांच्या मार्गदर्शनात कार्यरत असणार सरकार गेलं, आता लोकनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुन्हा विकासाची महाराष्ट्र घोडदौड करणार.”, असे ट्वीट राम सातपुते यांनी केले आहे.

दरम्यान शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड केल्याने आणि १० अपक्ष आमदारांनी साथ सोडल्याने महाविकास आघाडी सरकार आधीच संकटात आले होते. सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही, असे स्पष्ट दिसत असताना उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. आता देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल नवे सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करतील. भक्कम संख्याबळासह फडणवीस पुन्हा सत्तेत येणे निश्चित आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!