Share

Sanjay Raut : “जहालत एक किस्म कि मौत…”, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यातील राजकीय अस्थिरता, शिवसेनेशी बंडखोरी यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) तिखट शब्दांत प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. कधी माध्यमांशी बोलताना तर कधी सामना अग्रलेखातून ते प्रत्येक घडामोडीवर प्रत्युत्तर देत आहे. मात्र कालच (२७ जून) त्यांना इडीकडून जमीन घोटाळयाप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. तर आज त्यांनी पुन्हा एकदा ट्वीट करत चर्चांना वाट करून दिली आहे.

“जहालत एक किस्म कि मौत है, और जाहिल लोग चलती फिरती लाशे है…”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. यापूर्वीही त्यांनी सेनेशी बंड करणाऱ्या आमदारांवर निशाणा साधत टीका केली होती. आज त्यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा अप्रत्यक्ष बंडखोर आमदारांना टोला लगावला आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/1541598571765858305

दरम्यान जमीन घोटाळाप्रकरणी त्यांना संजय राऊत यांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांना आज २८ जून रोजी चौकशीला जावे लागणार आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्राचाळ पुनर्विकास घोटाळाप्रकरणी सदरील नोटीस देण्यात आली आहे. २००६ साली जॉईंट व्हेंचर अंतर्गत गुरू आशिष बिल्डरने पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. सदरील प्रकल्प २००८ साली सुरू झाला. मात्र, दहा वर्षानंतरही पत्राचाळीचा पुनर्विकास झाला नसल्याचे समोर आले. या गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक राकेश वाधवान असून वाधवान यांच्यासोबत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांचा संबंध आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!