Share

Maharashtra Politics : महाराष्ट्रातल्या बंडाप्रकरणी सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना बंडखोर आमदार आणि राज्य सरकार थेट कोर्टात पोहोचले आहे. सेनेच्या १६ आमदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी शिवसेनेने उपाध्यक्षांकडे  केली होती. या सर्व वादावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली आहे. यात सुप्रीम कोर्टाने बंड आमदारांप्रकरणी केंद्रालाही नोटीस पाठवली आहे.

महाराष्ट्रातील बंडप्रकरणी आता सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस बजावली असून केंद्राने शिंदे गट प्रकरणात भूमिका स्पष्ट करावी, असे कोर्टाने म्हटले आहे. सोबतच सुप्रीम कोर्टाकडून सर्व पक्षकारांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून साॅलिसिटर जनरल यांनी नोटीस स्वीकारली आहे. तसेच  उपाध्यक्षांनाही नोटीस बजावण्यात आली असून उपाध्यक्षांच्या वतीने धवन यांनी नोटीस स्वीकारली. दरम्यान सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणी ११ जुलैला ठेवली आहे.

दरम्यान आजच्या सुनावणीत अनेक मुद्दे शिंदे गटाचे वकील तसेच सरकारचे वकील यांनी समोर ठेवले. तर कोर्टानेही काही महत्वाचे प्रश्न उपस्थित करत या बंडखोर आमदारांना उत्तर देण्यासाठी ५ दिवसांचा अवधी वाढवून दिला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!