🕒 1 min read
मुंबई: शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदारांशी शिवसेना नेत्यांचा संपर्क झाला आहे, असा दावा काही शिवसेना नेत्यांनी केला असून असे एकूण 20 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सांताक्रुझमध्ये युवासेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना परत यांना विधानभवनाची पायरी चढू देणार नसल्याचे म्हटले आहे. यावरूनच आता माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी टीका केली आहे.
“बंडखोरांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. पण लोकशाहीमध्ये मताच्या पेटीतून राजा जन्माला येतो आणि त्याला जन्माला घालणारी ही सर्वसामान्य जनताच असते. आदित्यजी हे आपण कसं बरं विसरलात?”, असा टोला सदाभाऊ खोत यांनी ट्वीट करत लगावला आहे.
बंडखोरांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही – आदित्य ठाकरे
लोकशाहीमध्ये मताच्या पेटीतून राजा जन्माला येतो आणि त्याला जन्माला घालणारी ही सर्वसामान्य जनताच असते.
आदित्य जी हे आपण कसं बरं विसरलात..???
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) June 27, 2022
दरम्यान आदित्य ठाकरे म्हणाले कि, “बंडखोरांनी २० जून रोजी बंड पुकारला. मात्र धनुष्यबाण हा आपलाच राहणार, शिवसेना पक्ष आणि प्रेम आपलच राहणार. बंडखोरांपुढे दोनच पर्याय आहेत. एकतर प्रहार पक्षात विलीन व्हा, नाही तर भाजपमध्ये विलीन होणं हेच पर्याय आहे. परत यांना विधानभवनाची पायरी चढू देणार नाही. त्यांना निवडणुकीत पाडणार”
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : “…तरी राज्य सरकारने आपला धर्म सोडलेला नाही”, संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा
- Sanjay Raut : “महाराष्ट्राच्या राजकीय वगनाट्यात केंद्राचे डफली, तुणतुणेवाले उतरले असून राज्यातील ‘नाचे’…”, संजय राऊतांचा प्रहार
- Nilesh Rane : “उद्धव ठाकरेंनी आता स्वतःच्या गटाचं नाव…”, निलेश राणेंचा खोचक टोला
- Nikhil Wagle: एकनाथ शिंदेंची भाषा ‘भाजप’ची, फडणवीस किती काळ लपणार तुम्ही?; निखील वागळे यांचा टोला
- Eknath Shinde : “…यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल”, एकनाथ शिंदेंचा ट्वीट करत बंडखोरीमागील खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
