Share

Uday Samant : शिवसेना नेते उदय सामंत नॉट रिचेबल?; राजकीय चर्चांना उधान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेनेशी बंड करणारे एकनाथ शिंदे यांच्या गटातील इतर बंडखोर आमदारांची संख्या वाढतच आहे. मात्र आता शिवसेनेचे मंत्रीच शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना नेते तथा राज्याचे उच्च व तंत्र शक्ष्ण मंत्री उदय सामंत (Uday Samant) सध्या नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळपासून त्यांचा संपर्क लागत नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात अनेक चर्चांना उधान येत आहे.

आता उदय सामंत खरंच शिंदे गटाच्या मार्गावर आहेत का, याबाबत अजून तरी संपूर्ण माहिती मिळालेली नाहीये. मात्र सूत्रांनुसार उदय सामंत एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान महाराष्ट्राच्या राजकीय संकटाच्या सहाव्या दिवशी एक मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे गटात फूट पडल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटातील एक गट सातत्याने उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. आज (रविवार) शरद पवार यांच्यासोबत झालेल्या महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीत शिंदे गटाचे २० आमदार सतत संपर्कात असल्याचा दावा शिवसेना समर्थकांनी केला आहे.  या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनीदेखील मोठा खुलासा केला आहे.

आदित्य ठाकरे आज मुंबईतील शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले कि, “20 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. असे असतानाही एकनाथ शिंदे यांनी २० जून रोजी बंड केला. ऑफर दिली असता एकनाथ शिंदे यांनी टाळाटाळ केली.”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!