Share

Sanjay Raut : “बंडखोरांमध्ये देखील बंडखोरी होऊ शकते” ; संजय राऊतांचा सूचक इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर इतर आमदारांनीही बंड करत शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटात साधारण ४० हून अधिक शिवसेना आमदार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार आणि शिवसेना यांच्यामध्ये दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांना सूचक इशारा दिला आहे. आज सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.

“ते जेव्हा इथे येतील तेव्हा कळेल नक्की बंडखोरी कुठे होणार आहे. अस्वस्थता हा शब्द खूप सौम्य आहे. बंडखोरांमध्ये देखील बंडखोरी होऊ शकते”, अशा सूचक शब्दांत राऊतांनी बंडखोरांना इशारा दिला आहे. तसेच यावेळी संजय राऊत यांनी शहाजी बापू पाटलांना टोला लगावला आहे. “एक आमदार म्हणाला काय झाडी, काय हाटील, काय पाणी, काय डोंगार मग महाराष्ट्रात स्मशान आहे का? तिथे झाडी, फुलं, निसर्ग, दगडं, पाणी आहे, मग तुमच्या महाराष्ट्रात काय आहे, असं म्हणत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.

“तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावाल, त्यांचे भक्त आहोत असं म्हणाल. पण बाळासाहेबांचे भक्त अशा प्रकारे पाठित खंजीर नाही खुपसणार. जे व्हायचंय ते होऊ द्या. जे करायचंय ते करा. मुंबईत तर यावं लागले ना?”, असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!