Share

Sanjay Raut : “बाळासाहेबांचे भक्त अशा प्रकारे पाठित खंजीर नाही खुपसणार” ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर इतर आमदारांनीही बंड करत शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटात साधारण ४० हून अधिक शिवसेना आमदार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार आणि शिवसेना यांच्यामध्ये दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांना खुलं आव्हान दिलं आहे. आज सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावाल, त्यांचे भक्त आहोत असं म्हणाल. पण बाळासाहेबांचे भक्त अशा प्रकारे पाठित खंजीर नाही खुपसणार. जे व्हायचंय ते होऊ द्या. जे करायचंय ते करा. मुंबईत तर यावं लागले ना? तिथे बसून आम्हाला सल्ला-मार्गदर्शन करत आहेत. लाखो शिवसैनिक जमिनीवर आहेत. आमच्या एका इशाऱ्याची वाट पाहात आहेत. पण आम्ही अजूनही संयम ठेवला आहे. त्यामुळे कोण शक्तीप्रदर्शन करत आहेत, कोण काय करतंय त्यानं काही फरक पडत नाही”.

तसेच यावेळी संजय राऊत यांनी शहाजी बापू पाटलांना टोला लगावला आहे. “एक आमदार म्हणाला काय झाडी, काय हाटील, काय पाणी, काय डोंगार मग महाराष्ट्रात स्मशान आहे का? तिथे झाडी, फुलं, निसर्ग, दगडं, पाणी आहे, मग तुमच्या महाराष्ट्रात काय आहे, असं म्हणत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला. त्यांनी गुवाहाटीतील आमदारांवर अनेक टिकास्त्र सोडले.

महत्वाच्या  बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!