Share

Sanjay Raut : “बंडखोरांना अनेक बाप, आमचा एकच बाळासाहेब ठाकरे…!” ; संजय राऊत यांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, बंडखोर आमदार स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे भक्त म्हणवून घेत आहेत. बाळासाहेबांचे भक्त गुवाहाटीत असे पाठीवर खंजीर खुपसून बसत नाहीत. एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन राजीनामे देऊन निवडणूक लढवावी.

“बंडखोरांना अनेक बाप आहेत. आमचा एकच बाप बाळासाहेब ठाकरे आहेत. संजय राऊत म्हणाले की, तिथून बसून ते सांगत आहेत की तिथलं वातावरण खूप चांगलं आहे. समोर डोंगर आहे वगैरे वगैरे… महाराष्ट्रात स्मशानभूमी आहे का? तिथे भाजपच्या पैशावर पार्टी करत आहेत. आता तुमच्या दिल्लीच्या बापाच्या नावाने मते मागा,” असे आव्हान देखील संजय राऊत यांनी केले आहे.

दरम्यान, शिवसेनेची ‘युवासेना’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक आहे. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. दादर येथील शिवसेना भवनात ही बैठक होणार आहे. कालच संजय राऊत यांनी शिवसेनेच्या 7 बंडखोर मंत्र्यांना पदावरून हटवण्याचे संकेत दिले होते.

बरं झाली घाण गेली-

आदित्य ठाकरे यांनी देखील बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला.  बरं झाली घाण गेली, असे आदित्य ठाकरे म्हणाले. शनिवारी झालेल्या युवा सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. ज्यांना मदत केली, ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचे वाईट वाटते. बंडखोर आमदारांमध्ये जर हिंमत असती तर बंड करण्यासाठी सूरतला जाण्याची काय गरज होती? असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!