🕒 1 min read
मुंबई: विधान परिषदेच्या (Legislative Council elections) 10 जागांसाठी आज (सोमवार) मतदान होत आहे. या निवडणुकीत इतर पक्ष शिवसेना (Shiv sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले उमेदवार उभे केले असले तरी मुख्य लढत काँग्रेसच्या दुसऱ्या आणि भाजपच्या पाच उमेदवारांमध्ये आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत, ज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी प्रत्येकी दोन आणि भाजपने पाच उमेदवार उभे केले आहेत. प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी किमान २६ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्व पक्ष फिल्डींग लावत आहेत. भाजपकडून आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) आजारी असतानाही मतदान करण्यासाठी पुण्याहून रुग्णवाहिकेतून विधानभवन गाठले. मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांनीही आजारी असतानाही मतदानाचा हक्क बजावला. यावरच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकशाही आणि पक्ष यांच्यावरील @iLaxmanJagtap यांची निष्ठा निःशब्द करणारी आहे.
लक्ष्मणभाऊ, तुम्हाला पुन्हा एकदा सलाम! https://t.co/rxCk1JusXY— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 20, 2022
“लोकशाही आणि पक्ष यांच्यावरील लक्ष्मण जगताप यांची निष्ठा निःशब्द करणारी आहे. लक्ष्मणभाऊ, तुम्हाला पुन्हा एकदा सलाम!”, असे ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
दरम्यान आमदार लक्ष्मण जगताप यांनी ट्वीट करत विरोधकांना उत्तर दिल आहे. “ही लढाई प्रतिष्ठेची नसून पक्षनिष्ठा आणि लोकशाहीप्रती असलेले माझे कर्तव्य पार पाडण्याची आहे. त्यामुळे पक्षातील कोणीही आग्रह केला नसून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मी विधानभवनात मतदानाला आलो आहे.” आजारी असताना जीवाची पर्वा न करता आमदारांना मतदानासाठी आणल्यामुळे सत्ताधारी भाजपवर टीका करत आहेत. याला लक्ष्मण जगताप यांनी खोचक उत्तर दिल आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “अग्निपथ योजनेला विरोध करणारे देशद्रोही” ; बाबा रामदेव यांचे वक्तव्य
- ‘फादर्स डे’च्या दिवशी केकेची मुलगी तामारा झाली भावूक ; पोस्ट शेअर करत म्हणाली…
- “कुणी पावसात भिजलं तरी परिणाम होणार नाही” ; गोपीचंद पडळकरांचा पवारांना टोला
- “ही लढाई प्रतिष्ठेची नसून…” ; विधान परिषदेसाठी मतदान केल्यानंतर लक्ष्मण जगताप यांचं ट्वीट
- Agnipath Protest: ‘भारत बंद’मुळे दिल्लीत Traffic Jam
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
