🕒 1 min read
मुंबई: येणाऱ्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी पश्मिच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पदासाठी इच्छूक नसल्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून मतदान फिरवण्याची क्षमता असलेले शरद पवार एकमेव नेते असल्याचे म्हटले आहे.
हिंदुस्थान नामक महाकाय देशाचे पुढील राष्ट्रपती कोण होणार यावर आता दोन्ही बाजूंनी खल सुरू झाला आहे. अमेरिका, फ्रान्स, दक्षिण आफ्रिकेसारख्या राष्ट्रांत राष्ट्राध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया साधारण दीड दोन वर्षे आधी सुरु होते व त्या प्रक्रियेत एक गांभीर्य असते. आपल्या देशात असे गांभीर्य आज कुठे दिसते आहे काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
देशातील विरोधी पक्षाची बैठक दिल्लीत बुधवारी पार पहली व राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण यावर पहिली चर्चा झाली. शरद पवार हे राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत असे स्वतः त्यांनीच जाहीर केल्यामुळे विरोधकांच्या आघाडीच्या फुग्याची वाय गेली. शरद पवार नाहीत तर दुसरे कोण? तोलामोलाचा कोणी नेता विरोधी आघाडीचा उमेदवार होऊ शकेल काय? या प्रश्नांची उत्तरे अधांतरी सोडून ममता बॅनर्जी यांनी निमंत्रित केलेली बैठक संपली, महात्मा गांधीचे नातू गोपालकृष्ण गांधी, डॉ. फारुख अब्दुल्ला या नेहमीच्याच नावावर चर्चा झाली, पण ही नावे म्हणजे विरोधी आघाडीची बलस्थाने नाहीत. या दोन्ही नावांमुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण होईल असे त्यांचे व्यक्तिमत्व नाही.
डॉ. कलाम हे जनतेचे राष्ट्रपती होते व प्रणब मुखर्जी हे अनुभवी टोलेजंग व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक असूनही शिवसेनेने बिनधास्तपणे प्रणब मुखर्जी यांना मतदान केले होते. सरकार पक्षाकडून किंवा विरोधकांकडून असे उत्तुंग व्यक्तिमत्त्व राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून उभे राहणार आहे काय? शरद पवार हे एकमेव नेते देशात आहेत. त्यांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी मान्य केली तर या निवडणुकीत कांटे की टक्कर होईल. निवडणूक फक्त रंगतदारच होणार नाही, तर सरकार पक्षाला ही निवडणूक सोपी जाणार नाही. या निवडणुकीत देशभरातील विधानसभा सदस्य, लोकसभा, राज्यसभेचे सदस्य मतदान करतात. या घडीला यातील बरेचसे मतदान फिरवण्याची क्षमता असलेले शरद पवार हेच एकमेव नेते आहेत. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- पवार नाहीत, मग कोण?; राष्ट्रपती निवडणूकवरून संजय राऊतांचा सवाल
- फडणवीसांनी शरद पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेला भातखळकरांनी म्हटले, “नागपुरी मिरची म्हणजे…”
- “आधी माझी उधारी द्या…” ; हॉटेलचालकाने सदाभाऊ खोतांना अडवलं!
- VIDEO : जुनी सवय मोडायची नाय..! रोहित शर्मा मुंबईच्या गल्लीत खेळतोय क्रिकेट; ठोकला उंच षटकार!
- चाहत्यासोबत केलेल्या ‘त्या’ वर्तवणुकीमुळे मलायका अरोरा झाली ट्रोल ; पाहा VIDEO
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
