🕒 1 min read
मुंबई : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विराटच्या अॅटिट्यूडबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. विराट कोहली बऱ्याच दिवसांपासून फॉर्ममध्ये नाही. त्याला बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. असे असले तरी २०२१ हे वर्ष विराट कोहलीसाठी कठीण होते. हे ते वर्ष होते जेव्हा टीम इंडिया टी-२० विश्वचषक स्पर्धेत पहिल्या फेरीतून बाहेर पडली होती. त्यानंतर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कर्णधारपद सोडले. तत्पूर्वी, कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देत त्याला वनडे कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते.
आफ्रिदीने विराटच्या अॅटिट्यूडवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हणाला, ”कोहली अजूनही त्याच प्रेरणाने खेळतो आहे का, ज्याप्रमाणे तो सुरुवातीच्या काळात खेळत होता. कोहली पुन्हा नंबर १ खेळा़डू बनू इच्छितो का?’ किंवा त्याने जे काही मिळवले त्यावर तो समाधानी आहे. क्रिकेटमध्ये अॅटिट्यूडला खूप महत्त्व असते.”
आफ्रिदी पुढे म्हणाला, ”करिअरच्या सुरुवातीला विराट कोहलीला जगातील नंबर एक फलंदाज बनायचे होते. आता त्याच प्रेरणेने तो क्रिकेट खेळतोय का? हा एक मोठा प्रश्न आहे. त्याचा क्लास आहे. पण त्याला पुन्हा नंबर एक फलंदाज व्हायचे आहे का? त्याने आयुष्यात सर्वकाही मिळवले आहे, आता फक्त आराम करावा आणि वेळ घालवावा, असे त्याला वाटते आहे का?”
विराट कोहलीला अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. त्याने नोव्हेंबर २०१९ मध्ये कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या दिवस/रात्र कसोटी सामन्यात बांगलादेशविरुद्ध शतक केले. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावून आता दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आयपीएल २०२२ मध्येही विराट कोहलीची बॅट शांत राहिली. लीगच्या १५व्या मोसमात त्याने १६ सामन्यात ३४१ धावा केल्या. यादरम्यान त्याला केवळ दोन अर्धशतके झळकावता आली.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
