🕒 1 min read
मुंबई: पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका 21 वर्षीय महिलेचे ट्रॅव्हल्समधून अपहरण करत बलात्कार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. सदरील महिला कामानिमित्त बाहेर गावावरून पतीसोबत पुण्यात आली होती. पुण्यात राहण्यासाठी ते रूम शोधत होते. यावेळी आरोपीने या दाम्पत्याला ट्रॅव्हल्समध्येच झोपण्यास सांगितले. त्यानंतर ट्रॅव्हल्स अचानक सुरू करून कात्रज परिसरात महिलेवर बलात्कार केला.
या घटनेनंतर पुणे हादरले आहे. दरम्यान पीडित महिलेचा पती लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरला असता आरोपी नवनाथ शिवाजी भोग याने महिलेला जीवे मारण्याची धमकी देत स्वारगेटजवळ बलात्कार केला. त्यानंतर कात्रज बसस्टॉप जवळील कॅनॉल फुटपाथच्या बाजूला बस थांबवून पुन्हा बलात्कार केला.
पोलिसांच्या माहितीनुसार सदरील दाम्पत्य वाशीम येथून आले होते. या घटनेनंतर चालकाने महिलेला बसमधून खाली उतरवून दिले. या महिलेने स्वारगेटमध्ये तक्रार दिल्यानंतर आरोपीला बंगळुरु हायवेवर जेरबंद केल्याचे पोलिसांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
- “उद्धव ठाकरेंना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, राजीनामा द्या” ; रामदास आठवलेंची मागणी
- PAK vs WI : कोरोनामुळं नाही, तर ‘या’ कारणामुळं विंडीजच्या खेळाडूंनी मैदानातच लावले मास्क!
- अजित पवार यांना पुन्हा भाजपसोबत येण्याचे निमंत्रण !
- IND vs SA : “आता आम्हाला…”, भारताच्या कॅप्टननं कोणावर फोडलं सलग दुसऱ्या पराभवाचं खापर? वाचा!
- प्राजक्ता माळीची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट चर्चेत, नेमकं काय आहे प्रकरण ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
