Share

आता ‘B’ टीम पण मत देणार का हे देखील जाहीर करून टाका; ‘राष्ट्रवादी’चा आशिष शेलार यांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात सध्या राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलेच रंगू लागले आहे. भाजपकडून सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक यांना संधी देण्यात आली आहे. त्यात मत फुटू नये, यासाठी सर्वच पक्षांकडून काळजी घेण्यात येत आहे. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली असून यानंतर त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादी नेते क्लाईड क्रास्टो यांनी त्यांना टोला लगावला आहे.

“आशिष शेलार जी, तुम्हाला राज्यसभा निवडणुकीसाठी ‘C’ टीम मत देणार असल्याचे तुम्ही जाहीर केलेत. आता ‘B’ टीम पण मत देणार का हे देखील जाहीर करून टाका, जेणेकरून लोकांचा संभ्रम दूर होईल आणि दोन्ही टीम भाजपच्याच असल्याबद्दल कोणाच्याच मनात शंका उरणार नाही.”, असा टोला क्लाईड क्रास्टो यांनी लगावला आहे.

“येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत मनसेचे मत भाजपाला मिळावे म्हणून मी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना विनंती केली आहे. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या आमदारांना सांगितले आहे. त्यामुळे आमचा विजय आणखी सोपा होणार आहे.”, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!