🕒 1 min read
मुंबई: शिवसेना नेत्या दिपाली सय्यद सध्या भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये. काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना ‘घरी जा आणि स्वयंपाक बनवा’, असा सल्ला दिला होता. यावरून त्यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात आली. हा मुद्दा ताजा असतानाच आता दिपाली सय्यद यांनी दिव्या ढोले बदनामी प्रकरणाचा संदर्भ देत भाजपवर निशाणा साधला आहे.
“स्त्रीयांचा अपमान फक्त भाजपाच करू शकते. दिव्या ढोले बदनामी प्रकरणात कदाचीत भाजपा IT CELL चा हात असु शकतो? हा वाद पक्षांतर्गत राजकारणाचा विषय दिसुन येतो. तपास यंत्रणांनी मुंबई भाजप IT CELL च्या कार्यकर्त्यांची चौकशी करावी कदाचित सत्य लवकरच समोर येईल.”, अशी मागणी दिपाली सय्यद यांनी केली आहे.
स्त्रीयांचा अपमान फक्त भाजपाच करू शकते. दिव्या ढोले बदनामी प्रकरणात कदाचीत भाजपा IT CELL चा हात असु शकतो ? हा वाद पक्षाअंतर्गत राजकारणाचा विषय दिसुन येतो. तपास यंत्रणांनी मुंबई भाजप IT CELL च्या कार्यकर्त्यांची चौकशी करावी कदाचित सत्य लवकरच समोर येईल. @ShivSena @bjpsamvad
— Deepali Sayed (@deepalisayed) June 2, 2022
दरम्यान काही वर्षांपूर्वी भाजपच्या दिव्या ढोले यांना त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी असगर शेख यांच्या मोबाईलवरून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप होता. भारतीय जनता पक्षाचे धारावी मंडळ अध्यक्ष मनी बालन यांच्यावर धारावी पोलीस ठाणे येथे गुन्हाही नोंदवण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या:
- “खंडणी आणि दारूचा महसूल या विषयांची युनिव्हर्सिटी…”, अतुल भातखळकरांचा टोला
- बिहारमध्ये जातनिहाय जनगणना होणार?; मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले…
- विद्यमान सरकारने दिलेल्या आश्वासनांचे बुडबुडे निरपराध्यांच्या रक्ताने लाल का?; संजय राऊतांचा सवाल
- “…तरीही जम्मू-काश्मीर अशांतच का?”, संजय राऊतांचा केंद्राला सवाल
- KK चे क्रिकेटवरील प्रेम! गायले होते १९९९ च्या क्रिकेट विश्वचषकाचे थीम साँग; पाहा VIDEO!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
