🕒 1 min read
मुंबई : आयपीएल मेगा लिलावापूर्वी, गुजरात टायटन्सने त्यांच्या संघात ड्राफ्ट पिक म्हणून हार्दिक पंड्याचा समावेश केला होता. हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सचा कर्णधार बनवल्यानंतर अनेक दिग्गजांनी त्याच्या नेतृत्व करण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पण हार्दिकने या मोसमात आपल्या कर्णधारपदाने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. हार्दिकच्या नेतृत्वाखाली प्रथमच आयपीएल खेळणारा गुजरात टायटन्सचा संघ चॅम्पियन ठरला. याआधी लीग टप्प्यातही या संघाने १४ सामन्यांत १० विजय नोंदवले आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. आयपीएल २०२२ (IPL 2022 )मध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले.
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याने संघाचे शानदार नेतृत्व करून सर्वांनाच चुकीचे सिद्ध केले, असा विश्वास गावसकर यांनी व्यक्त केला. पड्याने ज्या पद्धतीने संघाचे नेतृत्व केले, खेळाडूंना एक संघ म्हणून जोडले, त्यावरून त्याच्यात नेतृत्वगुण असल्याचे दिसून येते आणि जेव्हा तुमच्यात नेतृत्व करण्याची क्षमता असते, तेव्हा राष्ट्रीय स्तरावर ही जबाबदारी पार पाडण्यासाठी दरवाजे आपोआप उघडतात, असे गावकर म्हणाले.
.@gujarat_titans winning their maiden IPL Title in their maiden IPL season at the Narendra Modi Stadium, Ahmedabad! @GCAMotera ???? ????
Stuff that dreams are made of! ☺️ ????
W. O. W! ???? ????#TATAIPL pic.twitter.com/qNMtJZHwDv
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
तो पुढे म्हणाला, “मला वाटते की भविष्यात टीम इंडियाचे कर्णधारपद स्वीकारण्याचे गुण पांड्यामध्ये आहेत. हे खरोखरच रोमांचक आहे. हार्दिक पुढचा कर्णधार असेल असे मी म्हणत नाही. पण, निवड समितीला पर्याय मिळाला आहे.” दुखापतीनंतर हार्दिकने आयपीएल २०२२मधून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले. अशा स्थितीत तो फलंदाजीसोबत गोलंदाजीही करू शकणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. हार्दिकने साऱ्या शंका बाजूला ठेवून लीगमध्ये शानदार गोलंदाजी केली. त्याने १५ सामन्यांमध्ये ३० पेक्षा जास्त षटके टाकली आणि ८ बळीही घेतले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
