Share

IPL 2022 : गुजरातने फक्त ‘या’ ५ खेळाडूंना दिली संपूर्ण हंगामात खेळण्याची संधी; हार्दिक पंड्याही नाही खेळू शकला सगळे सामने

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ (IPL 2022) चे विजेतेपद पटकावले आहे. या संघाने प्रथमच स्पर्धेत सहभाग घेतला आणि संघ थेट चॅम्पियन बनला. अंतिम सामान्यामध्ये गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने अप्रतिम कामगिरी केली. प्रथम गोलंदाजी करताना त्याने ३ बळी घेतले. त्यानंतर फलंदाजी करत ३४ धावा करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने ९ गडी गमावून १३० धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने ११ चेंडू व ७ गडी राखून लक्ष्य गाठले. कालच्या संपूर्ण सामन्यात एकही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. आयपीएल २०२२ चा चॅम्पियन बनल्यावर गुजरातला ट्रॉफी व्यतिरिक्त २० कोटी रुपये मिळाले.

गुजरात टायटन्सला विजय मिळवून देण्यात सर्वात खेळाडूंची महत्त्वाची भूमिका होती. संपूर्ण स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर सर्व १६ सामन्यांमध्ये फक्त ५ खेळाडू सातत्याने खेळताना दिसले. कर्णधार पंड्याही दुखापतीमुळे एक सामना खेळला नाही. संघाने स्पर्धेत एकूण १८ खेळाडू आजमावले. त्याचवेळी ५ खेळाडू असेही आहेत जे एकही सामना खेळू शकले नाहीत. प्रशिक्षक म्हणून आशिष नेहराने आपल्या शांत स्वभावामुळे सर्वांची मने जिंकली. सामन्यानंतर शुभमन गिल म्हणाला की, “आमची कोणतीही बैठक ८ मिनिटांपेक्षा जास्त चालली नाही. म्हणजेच संघ व्यवस्थापनाला आपल्या खेळाडूंवर विश्वास होता आणि सर्व खेळाडूंना त्यांच्या भूमिकेची जाणीव होती.”

डेव्हिड मिलर, शुबमन गिल, राहुल तेवतिया, रशीद खान आणि मोहम्मद शमी यांनी गुजरात टायटन्ससाठी संपूर्ण १६-१६ सामने खेळले. मिलरने यंदाच्या हंगामात २ अर्धशतकांच्या मदतीने ४८१ धावा केल्या. त्याची आयपीएलमधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. तर गिलने ४ अर्धशतकांच्या मदतीने ४८३ धावांचे योगदान दिले. संघाला संकटाच्या वेळी फलंदाजीने कमाल दाखवणाऱ्या तेवतियाने यंदाच्या हंगामात २१७ धावा केल्या. राशिद खानने ९१ धावा केल्या आणि फिरकी गोलंदाजीच्या बळावर म्हणून १९ बळी मिळवले. त्याची इकॉनोमी केवळ ६.५९ होती, जी उत्कृष्ट आहे. संघाकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक २० बळी घेतले. २० धावांत ३ बळी ही त्याची यंदाच्या हंगामातील एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी होती. याआधी त्याने आयपीएल २०२० मध्ये २० बळी मिळवले होते.

पंड्याने केली दमदार कामगिरी

हार्दिक पांड्याने सध्याच्या आयपीएलमध्ये बॅटने अप्रतिम कामगिरी केली. त्याने १५ सामन्यात ४८७ धावा केल्या. तसेच ४ अर्धशतके झळकावली. हार्दिक यंदाच्या हंगामात गुजरात संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. तसेच त्याने वेगवान गोलंदाजीच्या बळावर ८ बळीही मिळवले. यंदाच्या हंगामात गोलंदाजी करताना हार्दिक ची इकॉनॉमी ७.२७ अशी होती. याव्यतिरिक्त गुजरातचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने १३ सामन्यात १२ बळी घेतले. यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने ११ सामन्यात ३ अर्धशतकांच्या मदतीने ३१७ धावा केल्या. तर मॅथ्यू वेडने १० सामन्यांत १५७ धावांचे योगदान दिले. त्याला एकही अर्धशतक करता आले नाही. तसेच संघातील इतर कोणताही खेळाडू संघासाठी १० सामने खेळू शकला नाही.

यश दयालही चमकला

गुजरातने डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल याला लिलावात ३ कोटी २० लाख रुपयांना विकत घेतले होते. पदार्पणाच्या मोसमात त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने ९ सामन्यात ११ बळी मिळवले आहेत. साई किशोरने ५ सामन्यात ६ आणि अल्झारी जोसेफने ९ सामन्यात ७ बळी मिळवले. फलंदाज साई सुदर्शनने ५ सामन्यात अर्धशतकाच्या जोरावर १४४ धावा केल्या. त्याचवेळी अभिनव मनोहरने ८ सामन्यात १०८ धावा केल्या. इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉयला संघाने २ कोटी रुपयांना खरेदी केले. मात्र त्याने स्पर्धेतून माघार घेतली होती. लिलावापूर्वी संघाने पंड्या, गिल आणि राशीद यांना निवडले होते. संघाने आयपीएलच्या मेगा लिलावात फर्ग्युसनवर सर्वाधिक बोली लावली होती. संघाने त्याला 10 कोटी रुपयांना खरेदी केले होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!