🕒 1 min read
मुंबई: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी 31 मे 1725 साली झाला. दरवर्षी राज्यभरात त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनीही अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्याचे ठरवून त्यानुसार चौंडी येथे जोरदार तयारी करून त्या ठिकाणी महाराष्ट्रातील दिग्गज नेते, मंत्री यांना निमंत्रण दिले आहे. मात्र त्यापूर्वीच भाजप नेते राम शिंदे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
यावर्षी कुठलीही स्थानिक समितीची बैठक झाली नाही. राष्ट्रवादीने प्रशासनाला धरून कुणालाही परवानगी दिली नाही. दरवर्षी मी याठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करत असतो. मात्र स्थानिक आमदारांनी यालाही आडकाठी आणली. महाप्रसादाचे मंडप काढण्याचा प्रयत्न तिथे झाला. परंतु कुणालाही विश्वासात न घेता ते जयंती नाही तर राष्ट्रवादीचा मेळावा करताय. असा टोला राम शिंदे यांनी लगावला आहे.
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/793278434958280
नदी खोलीकरण कामाच्या माध्यमातून चौंडी येथे भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून काम करण्यात आले. परंतु रोहित पवारांचे बगलबच्चे आणि हस्तक यांनी मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन केले. याठिकाणी ग्रामपंचायतची ८० एकर जमीन रोहित पवारांनी स्थानिक संस्थेशी तडजोड करून आणि प्रशासनाला हाताशी धरून हडप केली आहे, असा आरोपही राम शिंदे यांनी केला आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 Final GT vs RR : “…तर चमत्कार घडू शकतात”, ट्रॉफी जिंकल्यानंतर हार्दिक पंड्या काय म्हणाला ते एकदा वाचाच!
- IPL 2022 : गुजरातच्या विजयाचे संबंध थेट भारताच्या २०११ विश्वचषक विजयाशी ; वाचा सविस्तर…!
- वैद्यनाथ कारखान्यावरून मंत्री धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर निशाणा ; म्हणाले…
- दिलखुलास, दिलदार उदयनराजे!, पुन्हा एकदा जिंकली लोकांची मने
- IPL 2022 : उमरान मलिक ठरला उदयोन्मुख खेळाडू..! तर ‘या’ खेळाडूला मिळाली दमदार गाडी; पाहा पुरस्कारांची यादी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
