🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील अंतिम सामना रविवार गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. सामन्यात गुजरातने राजस्थानचा पराभव करून आयपीएल २०२२ (IPL 2022) ची जिंकली. यंदाच्या हंगामातील अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरातने राजस्थानवर ७ गडी राखून विजय मिळवला. गुजरात नी त्यांच्या पहिल्याच आयपीएल हंगामात थेट विजेतेपदाला गवसणी घातली. गुजरात टायटन्सने त्यांच्या या विजयाची १२ वर्षांपूर्वी घरच्या मैदानावर २०११ च्या विश्वचषकात भारताच्या ऐतिहासिक विजयाची एक मनोरंजक समांतर रेखांकित केली. रविवारी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव केला.
शुबमन गिलने डावखुरा वेगवान गोलंदाज ओबेद मॅकॉयच्या चेंडूवर जबरदस्त षटकार मारून खेळ संपवला. विशेष म्हणजे, त्याने २०११ च्या विश्वचषकातील वानखेडे स्टेडियमवरील अंतिम सामन्यात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने घातलेली जर्सी क्रमांक ७ घातली होती. तेव्हा, आताच्या ४० वर्षीय धोनीने नुवान कुलसेखराला षटकार मारून विजय मिळवला होता.
Number 7️⃣ jersey
Finishing with a 6️⃣
Gary and Nehraji celebrating ????
Beating Sanga and Malinga's team ????????Where have we seen this before? ???? pic.twitter.com/lF8mHajQLw
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 29, 2022
गुजरातचे मार्गदर्शक गॅरी कर्स्टन त्यावेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. शिवाय, मेगा इव्हेंटमध्ये भारतीय संघाचा भाग असलेला आशिष नेहरा गुजरातचा मुख्य प्रशिक्षक आहे. २०११ च्या विश्वचषकाप्रमाणेच कुमार संगकारा आणि लसिथ मलिंगा पुन्हा पराभूत झाले. कारण यंदाच्या आयपीएल हंगामात कुमार संगकारा आणि लसिथ मलिंगा हे राजस्थान संघाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत.
अंतिम सामन्यातील विजयानंतर सामनावीराचा पुरस्कार जिंककेल्या कर्णधार हार्दिक पंड्याने संपूर्ण मोहिमेमध्ये कठोर परिश्रम घेतल्याबद्दल सपोर्ट स्टाफचे कौतुक केले. पंड्या म्हणाला की, “आशिष नेहरा, आशिष कपूर, गॅरीपासून ते लॉजिस्टिक स्टाफ तसेच सपोर्ट स्टाफला विजयाचे श्रेय जाते. हे विजेतेपद खास असणार आहे कारण आम्ही एक वारसा निर्माण करण्याबद्दल विचार केला होता. आणि त्यात आम्ही यशस्वी झालो. पुढील काळात येणाऱ्या पिढ्या याबद्दल नक्कीच बोलतील.”
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
