मुंबई: राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाचोरा येथील महालपुरे मंगल कार्यालयात शिवसंपर्क अभियानाप्रसंगी बोलत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. बाळासाहेबांसारखी भगवी शाल घेतली म्हणजे कुणीही बाळासाहेब होऊ शकत नाही. अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंना सुनावले.
“काही लोकांनी श्री राम, श्री हनुमान सारख्या देव देवतांचा आपल्या राजकीय स्वार्थापोटी पक्षात प्रवेश करुन घेतला आहे. भाजपणे तर शिवसेना पक्ष मुळ विचारापासून लांब गेल्याची बतावणी करत शिवसेनेला बदनाम करण्याचा ठेका घेतला आहे. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांसारखी भगवी शाल ओढली तर त्यांनी बाळासाहेब होण्याचे स्वप्न पाहू नये. त्यांचे भोंगे कधी पासूनच बंद झाले आहेत.”, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.
दरम्यान गुलाबराव पाटील यांनीम्हटले की, “शिवसैनिकांनी राज्यात झालेली विकास कामे जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी घेवून शिवसेनेची बदनामी करणाऱ्यांना उत्तर देण्याची धमक ठेवावी. वाढत्या महागाईपासुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजप शिवसेनेची बदनामी करत आहे.”
महत्वाच्या बातम्या:
- ‘शायद मेरे तपस्या में..’ ; राज्यसभा उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य!
- “किमान राजघराण्यातील व्यक्तींनी…”, निलेश राणेंचा संजय राऊतांवर निशाणा साधत छत्रपती घराण्याला सल्ला
- “फक्त मोठ्या बाता मारून सुराज्य होत नाही उद्धवजी”, ‘त्या’ घटनेवरून अतुल भातखळकरांचा टोला
- “अमरावती शहरात दंगली पेटवण्याचा आरोप…”, अनिल बोंडेंच्या उमेदवारीवरून ‘शिवसेने’चा टोला
- “किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील…”, अमोल मिटकरींचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
