Share

“किमान राजघराण्यातील व्यक्तींनी…”, निलेश राणेंचा संजय राऊतांवर निशाणा साधत छत्रपती घराण्याला सल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून राजकारण सुरु असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेऊन यावर चर्चा केली. त्यानंतर राऊत यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. यावरूनच भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

“किमान राजघराण्यातील व्यक्तींनी संजय राऊत यांच्यासारख्या फडतूस माणसाला बोलण्याची संधी देऊ नये. तुम्हीच एकमत दाखवलं नाही तर समाज तुमच्याकडून काय बोध घेईल? परत परत बोलून लाथ मारलेल्या खासदारकीला आपण महत्त्व देताय.”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांनी शब्द पाळला नसल्याची टीका केली आहे. यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेची भूमिका मांडली. आम्ही संभाजीराजे यांची उमेदवारी रद्द केली नाही तर त्यांना आमची भूमिका न पटल्याने ही उमेदवारी बाजूला पडली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!