Share

“पवार साहेब या जन्मातच काय तर…”, महेश तपासे यांचा सदाभाऊंवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

 मुंबई: माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ‘बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवार यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकले आहेत? हे मी वर गेल्या-गेल्या ब्रह्मदेवाला विचारणार आहे,’ असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला. यावरच आता राष्ट्रवादीचे नेते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

देशाचे नेते खासदार शरद पवार हुशार आहेत हे मान्य केल्याबद्दल सदाभाऊ खोत यांचे मनापासून आभार. मात्र पवार साहेब हे कुठल्या स्पेअर पार्ट ने बनले आहेत हे आपल्याला या जन्मात कधीही कळू शकणार नाही, कारण तुमची नजर फक्त द्वेषाचीच आहे.”, असा टोला महेश तपासे यांनी लगावला आहे. 

महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला विचारल्यास तोही हे सांगू शकेल की पवार साहेब प्रेम, सेवा, त्याग, दूरदृष्टी, कर्तृत्व याच स्पेअर पार्टनी बनलेले आहेत. परंतु आपले राजकारण फक्त पवार साहेबांचा द्वेष करण्यावरच टिकलेले आहे आणि म्हणूनच तुम्हाला पवार साहेब या जन्मातच काय तर अनेक जन्म घेतले तरीही कळणार नाहीत. अगदी ब्रम्हदेवाला जरी तुम्ही विचारलत तरी ते सुद्धा प्रेम, सेवा, त्याग, दूरदृष्टी, कर्तृत्व यांनी पवार साहेब बनले आहेत, असे आपल्याला सांगतील. असे महेश तपासे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!