🕒 1 min read
पुणे: गेल्या कित्येक औरंगाबाद शहराचे नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याचा मुद्दा प्रलंबित आहे. यावरूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज २२ मे रोजी पुण्यातील सभेत शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधत त्यांचा एकेरी उल्लेख केला आहे.
मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा चालू आहे मला कळतच नाही. आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व. वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही? तुम्हारी कमीज हमारी कमीजसे सफेद कैसे? प्रश्न रिझल्ट्सचा आहे. जे आम्ही देतो. जे आत्ता उत्तर प्रदेश, बिहारचं बोलतायत. आंदोलन होऊन १२-१४ वर्ष झाली. महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीसाठी तिथून हजारो लोक महाराष्ट्रात रेल्वे स्टेशनवर आले. आपले लोक त्यांच्याशी बोलायला गेले होते. तिथे बोलता बोलता त्या बाचाबाचीत तिथल्या एका मुलाने आपल्या एका पदाधिकाऱ्याला आईवरून शिवी दिली. आणि जे सगळं प्रकरण सुरू झालं .ते तिथून झालं. पण महाराष्ट्रात रेल्वे भरती होती याच्या जाहिराती महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रात कुठेही नाही. पण त्याच्या जाहिराती उत्तर प्रदेश, बिहारच्या वर्तमानपत्रात येत होत्या. तिथल्या रेल्वेभरतीमध्ये तिथल्या मुलांना नोकऱ्या मिळायला हव्यात. महाराष्ट्रातल्या भरतीमध्ये इथल्या मुलांना नोकऱ्या मिळायला हव्यात. ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री झाल्यानंतर स्थानिक भाषांमध्ये परीक्षा घ्यायचा निर्णय घेतला. हे त्या आंदोलनाचं यश आहे. असा उल्लेख राज ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरेंनी मला एक गोष्ट सांगावी की, तुमच्या अंगावर आंदोलन केल्याचा एक गुन्हा तरी आहे का? परवा दिवशी संभाजीनगरचे नामांतर झाले काय आणि नाही काय, मी बोलतो आहे ना असे म्हणाले. पण तुम्ही कोण आहात? तुम्ही वल्लभ भाई पटेल की महात्मा गांधी आहात? तुम्ही बोलताय त्याला काही तर्क आहे का? संभाजीनगरचा प्रश्न निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सतत जिवंत ठेवायचा आहे आणि त्यावरुन मते मिळवायची आहेत. संभाजीनगर झाले तर बोलायचे कशावर? शहरांमध्ये १०-१० दिवस पाणी येत नाहीये. ते विषयच नाहीत. असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- अजित दादाने भाजपसोबत छय्या छय्या केले, तुम्ही फोने बंद करून ठेवले; मनसेचा धनंजय मुंडेंना टोला
- IPL 2022 MI vs DC : खुलासा..! मॅचपूर्वी टिम डेव्हिडला आला होता डु प्लेसिसचा मेसेज; त्यात होता ‘असा’ PHOTO!
- “एमआयएमची औलाद येते आणि औरंगजेबाच्या पाया पडते” ; राज ठाकरे संतापले
- “हनुमान चालीसा वाचायला मातोश्री बंगला मशीद आहे का?”; राणा दाम्पत्याला राज ठाकरेंचा टोला
- “शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल तर…”, राज ठाकरेंचा टोला

