🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्सला नवव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या लीगच्या ५६व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (MI vs KKR) चोख प्रत्युत्तर देत मुंबईला ५२ धावांनी मात दिली. या सामन्यात कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अव्वल दर्जाची गोलंदाजी करत १० धावांत ५ बळी घेतले आणि कोलकाताला २० षटकात ९ बाद १६५ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात मुंबईकडून इशान किशन वगळता इतर सर्व फलंदाज पूर्णपणे ढेपाळले. कोलकाताने मुंबईला ११३ धावांवर ऑलआऊट केले.
मुंबईचा डाव
कोलकाताच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने कप्तान रोहित शर्माला (२) पहिल्याच षटकात गमावले. दुसरा सलामीवीर इशान किशनने एकहाती झुंज दिली. आंद्रे रसेलने तिलक वर्मा (६) आणि रमनदीप सिंग (१२) यांना आपला शिकार बनवले. कायरन पोलार्डही (१५) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. टिम डेव्हि़डला () वरुण चक्रवर्तीने रहाणेकरवी झेलबाद करत मुंबईला पराभवाच्या छायेत टाकले. १५व्या षटकात पॅट कमिन्सने अर्धशतक केलेल्या इशानला बाद करत संघाला पराभव निश्चित केला. इशानने ५ चौकार आणि एका षटकारासह ५१ धावा केल्या. १७.३ षटकात मुंबईचा डाव ११३ धावांवर आटोपला. कमिन्सने कोलकाताकडून सर्वाधिक ३ बळी घेतले.
That's that from Match 56.@KKRiders take this home comfortably with a 52-run win over #MumbaiIndians
Scorecard – https://t.co/eXsU8yDmge #MIvKKR #TATAIPL pic.twitter.com/3gu0ZsHYH6
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2022
कोलकाताचा डाव
अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर यांनी कोलकातासाठी ६० धावांची चांगली सलामी दिली. अय्यरने स्फोटक ३ चौकार आणि ४ षटकारांसह ४३ धावा केल्या, तर रहाणेने संयमी २५ धावा केल्या. फिरकीपटू कुमार कार्तिकेयने दोघांना बाद केले. त्यानंतर आलेला कप्तान श्रेयस अय्यर (६) मुरुगन अश्विनच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. घातक दिसत असलेल्यास आंद्रे रसेलला जसप्रीत बुमराहने १५व्या षटकात पोलार्डकरवी झेलबाद केले. एका बाजूने किल्ला लढवत असलेला नितीश राणाही याच षटकात बाद झाला. राणाने २५ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ४३ धावांचे योगदान दिले. बुमराहने १८व्या षटकात शेल्डन जॅक्सन (५) पॅट कमिन्स (०) आणि सुनील नरिनला (०) बाद करत आपले पाच बळी पूर्ण केले. २०व्या षटकात बुमराहने फक्त एकच धाव दिली आणि कोलकाताचा डाव २० षटकात ९ बाद १६५ धावांवर संपवला. बुमराहने ४ षटकात १ निर्धाव षटक टाकत आणि १० धावा देत ५ बळी घेतले.
दोन्ही संघांची Playing 11
मुंबई इंडियन्स – इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कप्तान), तिलक वर्मा, टिम डेव्हिड, कायरन पोलार्ड, रमणदीप सिंग, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ.
कोलकाता नाइट रायडर्स – अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरिन, शेल्डन जॅक्सन (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, टिम साऊदी, वरुण चक्रवर्ती.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
