Share

नवनीत राणा शरद पवारांच्या टेकुमुळे निवडून आल्या आहेत – एकनाथ खडसे

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवा. महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा निवडा, तुमच्यासमोर एक महिला उभी राहून लढून दाखवेल. तसेच रामाच्या आणि हनुमानाच्या नावावर सरकारने ज्याप्रकारे माझ्यावर अत्याचार केला, त्याचे उत्तर महाराष्ट्राची जनता यांना नक्की देईल असे नवनीत राणा म्हणाल्या होत्या. आता यावर एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नवनीत राणा या राष्ट्रवादीच्या व शरद पवारांच्या टेकुमुळे निवडून आलेल्या आहेत. त्यांनी स्वतःची ताकद आधी निर्माण करावी आणि मग मुख्यमंत्र्यांशी निवडणूक लढावी. तसेच येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीतर्फे? की स्वतंत्र लढवाव्यात हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचे सांगतानाच जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेची छुपी युती दिसून येत असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. रावेर तालुक्यातील कोचुर येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

राणा दाम्पत्याला न्यायालयाकडून नोटीस –

राणा या दाम्पत्याला न्यायालयाकडून जामीन काही अटी आणि शर्थीसह जामीन मंजूर झाला आहे. राणा दाम्पत्यावर लादून दिलेल्या अटी आणि शर्थी उल्लंघन झाल्यास, त्यांचा मंजूर झालेला जामीन रद्द होऊ शकतो, असे न्यायालयाने सांगितलं होतं. आता या प्रकरणी राणा दाम्पत्याला न्यायालयाने नोटीस बजावली आहे. न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन देताना काही अटी-शर्ती घालून दिल्या होत्या. पण या अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा करत सरकारी पक्षाने न्यायालयात धाव घेतली होती. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ही बाब  न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस पाठवली आहे. आम्ही तुमचा जामीन रद्द का करू नये, असे स्पष्टीकरण राणा दाम्पत्याकडून मागवण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!