🕒 1 min read
मुंबई : मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तसेच राजकीय नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या मालिका रंगलेल्या बघायला मिळत आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात सदाभाऊ खोत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘भाजप सत्तेत असताना बुलेट ट्रेन, हायपर लूप, समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार इत्यादी अशा गोष्टीवर चर्चा असायच्या.’
भाजप सत्तेत असताना बुलेट ट्रेन, हायपर लूप, समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार etc अशा गोष्टीवर चर्चा असायचा..!
पण आता महाराष्ट्रात चर्चा असते ती देशमुख, मलिक कांड, खंडणी, हाणामारी, घरकोंबडा, पेपर घोटाळा, आरक्षणाचा बट्याबोळ अशा विषयावर असते..!
फरक समजून घ्या ..!
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) May 7, 2022
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘सध्या महाराष्ट्रात चर्चा असते ती देशमुख, मलिक कांड, खंडणी, हाणामारी, घरकोंबडा, पेपर घोटाळा, आरक्षणाचा बट्याबोळ अशा विषयावर असते. फरक समजून घ्या’, असे खोत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “…मुख्यमंत्र्यांनी विसरू नये”, अतुल भातखळकर यांचा टोला
- “…मगर रगो में भी उबाल रखता हूं”, जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट चर्चेत
- “एका पोरामुळे मुंबईच्या पैशाचा चुराडा होतोय, याला…”, ‘त्या’ प्रकरणावरून निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
- IPL 2022 GT vs MI : रोहितनं ठोकला डोळ्यांची पारणं फेडणारा षटकार..! रणवीर सिंहही झाला फिदा; पाहा VIDEO!
- “…त्याचे परिणाम देर सवेर असेच येतात”, अतुल भातखळकर यांचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
