🕒 1 min read
मुंबई : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा १०० वा स्मृतिदिन हा ‘कृतज्ञता पर्व’ म्हणून काल (६ मे) साजरा करण्यात आला. त्यानिमित्त कोल्हापूरच्या शाहू मिल येथे आयोजित कृतज्ञता सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दूरभाष्य प्रणालीद्वारे उपस्थित राहिले.
यावेळी बोलत असतांना अजित पवार म्हणाले की,‘राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांवर राज्य चालत असून प्रत्येक पिढीनं शाहू विचारांचा अंगिकार केला पाहिजे. शाहूंच्या विचारांचा जागर नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे कृतज्ञता पर्व महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा शाहू महाराजांनी पुढे नेला. शाहू महाराजांचं काम हे डोंगरा एवढं मोठं असून त्यांचा प्रत्येक विचार हा क्रांतिकारी होता. त्यांच्या सामाजिक न्याय विचारांवरच सामाजिक क्रांती घडली.’
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा १०० वा स्मृतिदिन हा 'कृतज्ञता पर्व' म्हणून आज साजरा करण्यात आला. त्यानिमित्त कोल्हापूरच्या शाहू मिल येथे आयोजित कृतज्ञता सभेत मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्यासमवेत दूरभाष्य प्रणालीद्वारे उपस्थित राहिलो. pic.twitter.com/gg6xZ0bUUJ
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 6, 2022
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘छत्रपती शाहू महाराज हे रयतेचे काळजी घेणारे, आधुनिकतेचा स्विकार करणारे व दूरदृष्टी असलेले लोकराजा होते व त्यांनी सर्व जाती धर्मांना एकत्रित ठेऊन विविध क्षेत्रात विकास घडवून आणला.’ तसेच कोल्हापुरात सारथी संस्थेसाठी जागा देण्यात आलेली असून त्याबाबतचा आराखडा पुढील पंधरा दिवसात पूर्ण होईल. कोणत्याही महापुरुषाच्या स्मारकासाठी अंदाजपत्रकातील निधी ठेवण्याची आवश्यकता नाही तर, अशा स्मारकासाठी जेवढा आवश्यक निधी असेल तो सर्व निधी देण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची असून शाहू स्मारकासाठी जेवढा लागेल तेवढा निधी शासन उपलब्ध करून देईल, असेही पवार यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “….त्याला मस्तवाल करणाऱ्यांनाच जनतेने सत्तेवर आणले”, संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
- “काही जणांना फक्त अधिकार कळतात, कर्तव्ये…”, अतुल भातखळकरांचा टोला
- “फुले, शाहुंचे विचार आंबेडकरांनी पुस्तकात बंद केले”- जितेंद्र आव्हाड
- “भोंग्याच्या मुद्द्यावर राज ठाकरेंना जनतेचा ठेंगा मिळाला” – गुलाबराव पाटील
- “हनुमान चालीसा म्हणणे हा राजद्रोह कसा होऊ शकतो”- सुधीर मुनगंटीवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
